वाहे निर्मळ जेथे गंगा अवखळ
माझ्या मनीचे तरंग होती निर्मळ
भाग्य ऐसे हे आज झाले साकार
परमहंसाचा व्हावा जयजयकार ......१
न पडे भाषा कवणी आज कर्णी
आटले सारे शब्द न बोले वाणी
शब्द्-वेदा सहित विरला ओंकार
परमहंसाचा व्हावा जयजयकार .....२
मौनाचे सांगणे मौनाचे ऐकणे
उमजुनि शिष्याचे धुंदित नाचणे
उपदेशाचा कैसा हा दक्षिणमार्ग
परमहंसाचा व्हावा जयजयकार .....३
द्रुश्य ते संविद जे जे पाहिजे डोळा
राहे साक्षी जैसा वर्ते दिनकरा
सत्-चित्-सुखाचा वाहे अभिषेक
परमहंसाचा व्हावा जयजयकार ......४
जन्माच जेंव्हा लोपे आठव
असणे विरघळे जेथे आनंदसागर
नुरला आत्मा आता नुरले ब्रम्ह
परमहंसाचा व्हावा जयजयकार ........५
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment